This blog contains some strange but true thoughts of yours & mine about Nature,Emotions,Love,Devotion & Society.
Thursday, April 30, 2015
Friday, November 7, 2014
जात कोणती…?
जातीयता हा एकविसाव्या शतकातील महाराष्ट्राला लागलेला शाप आहे
अजूनही लोकं जाती-पातीत गुंतलेली आहेत हे महाराष्ट्राच दुर्दैव आहे
एकेमेकांची हृदये जुळवान्याऐवजी आपण आधी जात जुळवतो
एकेमेकांची रक्त तपासणीच्या ऐवजी पत्रिका आधी तपासली जाते
एकेमेकांचे विचार पाहण्या ऐवजी आपण धर्म पाहतो
का….? इतर धर्मातले -जातीतले लोक एकमेकांबरोबर राहूच नाही शकत ?
आपली समानता फक्त १५ ऑगस्ट ला आणि २६ जानेवारीला बाहेर पडते
इतर दिवशी ती आमच्या नसानसात भिनलेली नसते , का ?
म्हणे माझी जात विश्वात जिवंत राहिली पाहिजे
माझा धर्म विश्वात शोभून दिसायला हवा
ह्यावर विनोबा भावेंचे एक सुंदर वाक्य आहे
विश्वाची काळजी तू नको करूस
विश्वाची काळजी करण्यास विठोबा समर्थ आहे…. !
आपण श्री साईबाबांचे स्मरण करतो
मग त्यांची सर्व धर्म-जात सम भावाची शिकवण का विसरतो ?
खुद्द शिवरायांनी त्यांच्या स्वराज्यात जाती-धर्माला थारा दिला नव्हता
मग आपण जाती-धर्माचे एवढा अवडंबर का आणि कशासाठी करायचा ?
जाती-धर्माच्या नावावर कोणीही कितीही अवडंबर माजवले तरी
त्याला छेद देणारा बाजीराव-मस्तानी जन्म घेतातच
जगा,प्रेम करा आणि आनंदी राहा
जर तुम्हाला नसेल मान्य
तर इतरांना राहूद्या …!
: कविश्वर:अभिजित हराळे
Saturday, April 26, 2014
Saturday, September 15, 2012
Thursday, May 24, 2012
Sunday, April 29, 2012
Subscribe to:
Posts (Atom)


.jpg)

